इंदापूर : आय मिरर
इंदापूर सायकल क्लबचे सदस्य करेवाडी येथील योगेश करे व गंगावळण येथील विशाल ठोंबरे हे दोन तरुण इंदापूर ते थायलंड सायकल दौरा करणार आहेत. हा प्रवास जवळपास 4 हजार 500 किलोमीटरचा आहे. या प्रवासादरम्यान ते पर्यावरण,मृदा संवर्धन व आरोग्य विषयक जनजागृती करणार आहेत.
इंदापूर मधून एक ऑक्टोबर पासून त्यांनी आपल्या या सायकल प्रवासाचा श्रीगणेशा केला आहे. ते दररोज 80 ते 100 किमीचा प्रवास करणार आहेत. या दोन्ही तरुणांना इंदापूर सायकल क्लब च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्यात.
इंदापूर सायकल क्लबचे अध्यक्ष सुनील मोहिते यांनी सायकल क्लब च्या वतीने या दोन्ही तरुणांचा सत्कार करतइंदापूरच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितलेय.इंदापूर मधून परदेशाची सायकल वारी करणारे हे पहिलेच तरुण असल्याने त्यांना क्लबच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं आश्वासन ही त्यांनी दिलेय.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व सायकल क्लबचे सदस्य स्वप्निल सावंत, दशरथ भोंग, रमेश शिंदे, असलम शेख, विनायक वाघमारे,अमित बधे, डॉ मारुती माने, ज्ञानदेव डोंगरे, उमेश राऊत इत्यादी उपस्थित होते