“दूध उत्पादक व प्रक्रिया विक्री कल्याणकारी संघ या राज्यातील सहकारी व खासगी दूध ब्रँडधारकांची येथील कात्रज मुख्यालयात दुधाच्या खरेदी-विक्री दर आणि अन्य अडचणींवर कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दि.३० रोजी बैठक झाली. त्यामध्ये ग्राहकांसाठी दूध विक्री दर प्रतिलिटरला ५४ रुपयांपेक्षा अधिक नसावा आदींसह अन्य चार ठराव सर्वानुमते मंजूर झाले आहेत. सध्या गायीच्या दुधाची विक्री ५२ ते ५४ रुपये दरानेच होत आहे.बैठकीनंतर झालेल्या निर्णयाची माहिती सायंकाळी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर आदींनी पत्रकार परिषदेत दिली.”
इंदापूर : आय मिरर
रविवारी राज्यातील प्रमुख दूध उत्पादक संस्थांची पुण्यात कात्रज येथे बैठक पार पडलीय.त्यामध्ये गाय पॅकिंग दूधाचा ५४ रुपये पेक्षा अधिक दर नसावा असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.मात्र शेतकऱ्यांच्या मुंढीवर सुरी ठेऊन तुम्ही जर दर घेणार असाल तर आम्ही हे पांढरे हत्ती पोसणार नाही.शेतकऱ्यांवर अन्याय सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अँड.श्रीकांत करे यांनी दिली आहे.
करे म्हणाले की, दूध संघांनी एक चाल खेळली.५४ रुपये दूध विक्रीचा दर ठरवला.त्यामध्ये ग्राहक हित पाहतोय असं दाखवले.मात्र जर तुमची विक्री किंमत ठरली तर खरेदी किंमत आपोआप दबावात येणार.आज लंप्मी चा प्रादुर्भाव व दुधातील भेसळ रोखली जात असल्याने दुधा खरेदीचे दर आणखी पाच रुपयाने वाढतील.मात्र ३५ रुपयाच्यावर शेतकऱ्याला दर द्यायचा नाही हे तुमच्या डोक्यात आहे.हे झारीतील शुक्राचार्य आहेत दूध उत्पादकांनी हे ओळखायला हवं असं ही त्यांनी म्हटले आहे.

तुम्हाला दूध विक्री दर ठरवण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न त्यांनी केला असून ज्यांना ज्या दराने विक्री करायची आहे त्या दराने करतील आणि ज्या दराने ग्राहकाला खरेदी करायची आहे त्या दराने ग्राहक खरेदी करतील.शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढला आहे.मशागतीचा,चाऱ्याचा खुर्चीवर वाढला आहे.मात्र पशुखाद्याच्या दरावर कोणताही संघ बोलत नाही.त्याच्या किमतीवर नियंत्रण आहे का? एक रुपया वाढला की शंभर रूपये वाढवता.सदोष मिल्कमिटर, सदोष वजनजकाटा यावर हे बोलायला तयार नाहीत.ज्याप्रमाणे साखर व्यवसायात मोनोपाॅली आहे त्याप्रमाणे आता दूध धंद्यात ही मोनोपाॅली निर्माण करण्याचा अट्टाहास आहे शेतकऱ्यांनी ती मोनोपाॅली मोडून काढावी.सरकारने यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमिका घ्यावी असं ही ते म्हणाले.
परराज्यातील संस्थामुळेचं महाराष्ट्रातील दुग्धोत्पादकांना चांगला दर मिळतो…
इतर राज्यात एक राज्य एक ब्रॅण्ड आहे.त्या सरकारी संस्था आहे म्हणून ते ते सरकार त्यांना लिटरला ५ रुपये अनुदान देते.महाराष्ट्रात तस नाही इथे अनेक ब्रँण्ड आहेत. परराज्यातील संस्था महाराष्ट्रात येण्यापूर्वी महाराष्ट्रात दुधाचा दर हा १७ ते २० रूपये लिटर होता. ज्यावेळी परराज्यातील संस्था महाराष्ट्रात आल्या तेव्हा स्पर्धा निर्माण झाली, शेतकऱ्याला वाव मिळाला त्यामुळे दूध सम्राटांनी मोनोपाॅली तुटून निघाली. त्यामुळे परराज्यातील संस्थामुळे महाराष्ट्रातील दुग्धोत्पादकांना चांगला दर मिळतो आहे हे वास्तव असून ते मान्य करावे लागेल असं अँड.करे म्हणाले आहेत.
दूध संघांनी दर चढ-उतार निधी स्थापन करायला हवा.खरेदी व विक्री दरावर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणा असायला हवी.सरकारने स्थापन केलेल्या समितीनेच दर निश्चित करणे अनिवार्य करावे.सरकारने स्थापन केलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.
बाहेरील राज्यातील दूध संस्थांना काही अटी व शर्ती असणे आवश्यक. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान दिले जावे अशा विविध मुद्द्यावर ही बैठक पार पडणार होती.त्यावर शेतकऱ्याच्या दुधाला दर मिळणार असेल तर परराज्यातील काय परदेशातील संस्था महाराष्ट्रात आल्या पाहिजेत अशी मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अँड.श्रीकांत करे यांनी केली होती.