इंदापूर : आय मिरर
कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीकडील नोंदणीकृत दिव्यांगांना ५%दिव्यांग कल्याण निधीचे वितरण करण्यात आले व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच रविंद्र पाटील,उपसरपंच कोंडाबाई जाधव,रेखा बाबर, तेजमाला बाबर,कमल राखुंडे,आशाबाई तुपसौंदर,किसन सरडे, उल्हास पाटील,विजय सोनवणे ग्रामसेविका स्वाती चव्हाण,पोलीस पाटील शैलजा पाटील ,दशरथ बाबर उपस्थित होते.यावेळी नंदा बाबर,कमल राखुंडे,अशोक कसबे,किसन राखुंडे ,उमेश सोनवणे या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सरपंच रविंद्र पाटील म्हणाले की,दिव्यांगांनी कुठल्याही प्रकारचा न्युनगंड न बाळगता समाजात वावरले पाहिजे. ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती सर्व मदत दिव्यांग बांधवांना केली जाईल. आभार ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग इंगळे व संतोष बाबर यांनी प्रयत्न केले.