आय मिरर
भारतातील अनेक प्रतिभावंतानी एमएफडीएफ सिजन-११ च्या मिस्टर, मिस आणि मिसेस एशिया शो मध्ये आपल्या उत्कृष्ट कलागुणांचा वर्षाव केला. त्याचे आयोजन स्वप्नांची नगरी मुंबईमध्ये २५ डिसेंबर २०२२ ला करण्यात आले.ज्या मध्ये मध्य प्रदेशचा प्रतापसिंह चौहान मिस्टर एशिया, मध्य प्रदेशची सिमरन रघुवंशी मिसेस एशिया आणि महाराष्ट्राची पियुष्या लांडगे ही मिस एशियाची मानकरी ठरली.
या शो मध्ये विशेष पाहुणे म्हणुन मिस्टर वर्ल्ड आणि बॉलिवुड स्टार मिस्टर रोहीत खंडेलवाल आले होते. जे की भारताचे पहले मिस्टर वर्ल्ड आहेत. पियुषा लांडगे ही महाराष्ट्राची पहीली MFDF सिझन ११ ची मिस एशिया झाली आहे.पीयुषा ही मूळची इंदापूरची असून तिची आई मनिषा लांडगे ह्या इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी करतात तर वडील सोपान लांडगे हे पण टेंभुर्णी येथे प्राध्यापक आहेत.तर पियुषा ही बी.फार्मसीचे शिक्षण घेत आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.