आय मिरर
इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी एकत्र आले होते.त्यांनी अतिशय पारंपारिक पद्धतीने स्नेहमेळावा आयोजित करत जुन्या आठवणी ताज्या केल्या.इंदापूर शहरातील श्री.नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये रविवारी २९ जानेवारी रोजी हा स्नेहमेळावा पार पडला आहे.यावेळी पुन्हा एकदा शाळा भरल्याचा अनुभव माजी विद्यार्थ्यांना आला.
सन १९९७/१९९८ या वर्षातील इयत्ता दहावीतील श्री.नारायणदास रामदास हायस्कूल,इंदापूर मधील माजी विद्यार्थ्यांनी रविवार, दि.२९/०१/२०२३ रोजी एकत्रित पारंपरिक पद्धतीने आपल्या आयुष्यातील एक विलक्षण क्षण अनुभवला.शालेय जीवनात आपणाला आयुष्याचे धडे गिरवायला शिकवणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःसहीत सर्व शिक्षकांना बॅच लावुन,फेटे घालुन फोटो पॉईंट वर त्यांचे फोटो घेण त्यांचा आनंद व्दिगुणीत केला.आलेल्या शिक्षकांना गुलाब देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलाने आणि राष्ट्रगीताने या सोहळ्याची सुरवात झाली.
यावेळी शाळेचे सद्ध्याचे उप-मुख्याध्यापक अशोक भोईटे, माजी मुख्याध्यापक मनोहर खुसपे, माजी वर्गशिक्षिका स्मिता खेडकर,सुभाष महाजन,बाबासाहेब घाडगे, जनार्दन देवकर,गोरक्षनाथ ठोंबरे,सूर्यकांत फडतरे,सुभाष दास,मारुती वाघमोडे,शरद दीक्षित,संजय सोरटे,महादेव चव्हाण,राजेंद्र चव्हाण,सुनील माळी,राजेंद्र कदम,राजेंद्र जाधव व प्रताप सुर्वे असे वंदनीय शिक्षक उपस्थित होते.
यावेळी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून एक गोड आठवण म्हणून वॉटर फिल्टर व वायरलेस साऊंड सिस्टिम या दोन भेटवस्तु देण्यात आल्या. सर्व शिक्षकांचा सत्कार माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या हस्ते आकर्षक नॅपकिन बुके व उपयुक्त भेटवस्तू देऊन केला. तसेच उपस्थित शिक्षकांना सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतःविषयी व त्यांच्या सद्ध्या काम करीत असलेल्या नोकरी अथवा व्यवसायांविषयी माहिती दिली.
यावेळी उपस्थित सर्वच शिक्षकांनी मोलाचे विचार व मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात अपर्णा काळेल,हर्षवर्धन कवित्के, मृणालिनी वाघमोडे,निलेश कुंभार,अश्विनी बानकर,माजिद पठाण,प्रतापसिंह साळुंखे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या शाळेने आम्हाला शिक्षण दिलंच शिवाय योग्य संस्कारही दिले,शिकवण दिली आणि आपण कितीही मोठे झालो तरी गावाशी असलेले नातं विसरायचं नाही व म्हणुनच हा कार्यक्रम इंदापूरमध्ये शाळेत घेण्यात आल्याचे,विद्यार्थ्यांनी सांगितले.स्वतःला घडविण्यात या सर्व शिक्षकांचा फार मोठा वाटा असून या शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे सर्वच विद्यार्थी यशस्वीरित्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असल्याचे विद्यार्थ्यांनी नमुद केले.
कार्यक्रमानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. उत्कृष्टपणे, नियोजनबद्ध असा हा सोहळा झालेचे सर्व शिक्षकांनी सांगितले.या स्नहमेळाव्या च्या निमित्ताने थोडी गाणे म्हणणे,गप्पा गोष्टी,शाळेतील वर्गामध्ये बेंच वर बसुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोहेब बागवान,विशाल ढोले,महेश पडतुरे,मनोज जाधव,बंडोपंत नागाळे, विकास गायकवाड, शितल सोनवणे, शिल्पा भालेराव,सारीका कानगुडे यांनी प्रयत्न केले.
यावेळी दीप्ती कोठारी,अश्विनी मोरे,प्रतिमा,शिंदे तेजल मार्कड, सतीश अनगरे,संतोष जगताप, ज्ञानेश्वर कदम, स्वप्निल रंजणकर, हमीद सय्यद,नितिन व्यवहारे, श्रीनिवास सुरवसे,रमेश पवार, सचिन जाधव,उदय नलवडे हे माजी विद्यार्थीनी नीअतिशय हिरारीने सहभाग घेतला.सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.ॲड.अमोल शहा यांनी सुत्रसंचालन तर धनश्री मुळे हिने प्रास्ताविक केले.अमित जौंजाळ याने आभार मानले.