• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Saturday, June 3, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home कृषिनामा

शेतकऱ्यांनो ! 31 मार्चपर्यंत वीजबिल भरा अनं 30 टक्के सवलत मिळवा ! वाचा महावितरण ची ही योजना

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
March 28, 2023
in कृषिनामा
0
शेतकऱ्यांनो ! 31 मार्चपर्यंत वीजबिल भरा अनं 30 टक्के सवलत मिळवा ! वाचा महावितरण ची ही योजना

आय मिरर

शेतकऱ्यांनी कृषिपंपाचा भरणा करावा, यासाठी सवलत योजना जाहीर करून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जातो. याच अनुषंगाने महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे.

31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ होणार असून योजना संपण्यास काही दिवसांचा अवधी आहे.

वीजबिल म्हटलं नेहमीच ग्राहकांकडून अनेक कारणं पुढे केली जातात. या यावर उपाय म्हणून महावितरणकडून थकलेल्या वीजबिलांची वसुली करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. वसुलीसाठी विशेष पथके तैनात करून वसुली केली जाते अनेकदा शेतकऱ्यांना आवाहनही केले जाते. नाशिक महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना अस्तित्वात आहेत. अनेक शेतकरी शेतीला पाणी भरण्यासाठी मोटरचा वापर करतात, यामुळे वीजबिल मोठी वाढ होते.

अशावेळी अनेकदा शेतकऱ्यांकडे वीजबिल थकीत होते. याच पार्श्वभूमीवर कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी सवलत योजना राबविली जात आहे. या धोरणाअंतर्गत जे शेतकरी 31 मार्चपर्यंत थकीत वीजबिल भरतील, त्यांना वीजबिलावर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. या आवाहनानंतरही फार मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे आलेले नाहीत. थकबाकीची रक्कम मोठी आहे तर दुसरीकडे सवलत योजनेचा लाभ फार थोड्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Mahavitaran Scheme : काय आहे योजना

कृषीपंप शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या वतीने कृषी धोरण 2020 राबविण्यात येत आहे. मागीलवर्षी ही योजना सुरु झाली होती. तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्ष आहे. दुसऱ्या वर्षाची मुदत येत्या 31 मार्चला संपणार आहे.

Mahavitaran Scheme : थकबाकी भरल्यास अतिरिक्त सूट

कृषीपंप ग्राहकांसाठी असलेली योजना तीन टप्प्यात राबवि जात आहे. प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना 50 टक्के अतिरिक्त सूट, दुसऱ्या वर्षी भरल्यास 30 टक्के व तिसऱ्या वर्षी थकबाकी भरल्यास 20 टक्के अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाचा कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीज बिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे.

Mahavitaran Scheme : 31 मार्चपर्यंत मुदत

कृषी धोरण-2020 योजनेनुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जे शेतकरी 31 मार्च थकबाकीची रक्कम भरतील, अशा शेतकऱ्यांना थकबाकीवर 30 टक्के सवलत दिली जात आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारात माफी, तर सुधारित थकबाकीतही 30 टक्के सूट देण्यात आली आहे. या योजनेसाठी अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही केवळ नंतर बघू, पैसे आले तर भरु असे म्हणत योजनेची मुदत संपुष्टात येत आहे.

Mahavitaran Scheme : सुमारे 3 हजार कोटींची थकबाकी

  • नाशिक परिमंडळात मालेगाव आणि नाशिक असे दोन परिमंडळे असून नाशिक परिमंडळातील 1 लाख 63
  • हजार 661 ग्राहकांकडे 1 हजार 456 कोटी तर नाशिक मंडळातील 1 लाख 86 हजार 256 ग्राहकांकडे 1 हजार
  • 881 कोटींची थकबाकी अशी एकूण 3 हजार कोटींची थकबाकी आहे.
Views: 925
Share

Related Posts

बिगुल इंदापूर बाजार समितीचं ! चौथ्या दिवशी दाखल झाले बारा अर्ज ; ३ एप्रिल नामनिर्देशनासाठी अखेरचा दिवस
कृषिनामा

इंदापूर बाजार समितीत हमीभावात मका शेतमाल खरेदीस ऑनलाईन नोंदणी सुरु – सभापती विलासराव माने

May 26, 2023
इंदापूर बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने तर उपसभापती पदी रोहित मोहोळकर बिनविरोध
कृषिनामा

इंदापूर बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने तर उपसभापती पदी रोहित मोहोळकर बिनविरोध

May 20, 2023
तीन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरचं ! प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचे आले आदेश
कृषिनामा

तीन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरचं ! प्राथमिक मतदार यादी तयार करण्याचे आले आदेश

May 13, 2023
बिगुल इंदापूर बाजार समितीचं ! चौथ्या दिवशी दाखल झाले बारा अर्ज ; ३ एप्रिल नामनिर्देशनासाठी अखेरचा दिवस
कृषिनामा

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे इंदापूर बाजार समितीचे आवाहन

April 14, 2023
बिगुल इंदापूर बाजार समितीचं ! चौथ्या दिवशी दाखल झाले बारा अर्ज ; ३ एप्रिल नामनिर्देशनासाठी अखेरचा दिवस
कृषिनामा

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अकरा अर्ज ठरले बाद ; तर 146 अर्ज ठरले पात्र

April 6, 2023
ठरावीक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने कांद्याचे दर दबावात ठेवले – जिल्हाध्यक्ष एडवोकेट करेंचा आरोप
कृषिनामा

ठरावीक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने कांद्याचे दर दबावात ठेवले – जिल्हाध्यक्ष एडवोकेट करेंचा आरोप

April 2, 2023
Next Post
बाप रे…रात्रीच्या अंधारात जीपने 8 जणांना चिरडले, भीषण अपघातात दोन चिमुकल्यासह 5 जणांचा मृत्यू – 3 गंभीर जखमी

बाप रे…रात्रीच्या अंधारात जीपने 8 जणांना चिरडले, भीषण अपघातात दोन चिमुकल्यासह 5 जणांचा मृत्यू - 3 गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • जागतिक सायकल दिनी इंदापूरात सायकल रॅली,दिला “सायकल चालवा निरोगी रहा” चा संदेश
  • ओडिशा रेल्वे अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी
  • कोल्हापुरचे पार्सल पुढच्या निवडणुकीत पाठवून देऊ ! आपच्या नेत्यांनी पुण्यात व्यक्त केला विश्वास
  • पळसदेवच्या एल.जी.बनसुडे विद्यालयाची सलग सहाव्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!