घोडेगांव : आय मिरर
पुण्यातील शिवाजीनगर एस.टी.डेपोत तुमच्या पतीला पुन्हा कामावर रुजु करुन देते असे सांगत आंबेगांव तालुक्यातील भिमाशंकर येथील एका महिलेची जळोची येथील एका महिलेने १ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद घोडेगांव पोलीसांत दाखल करण्यात आलीय.या संदर्भात मिना दत्तात्रय मोरमारे,वय ४४ वर्षे,रा. भिमाशंकर ता.आंबेगाव जि. पुणे यांच्या फिर्यादीवरुन घोडेगाव पोलीस ठाण्यात निता विजय ढवण रा.भिगवण रोड,श्रीराम नगर,जऴोची बारामती, ता. बारामती जि. पुणे यांविरुध्द भा.द वि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की,दि.१३ आँगस्ट २०२१ रोजी ते दि.२८ सप्टेंबर २०२२ दरम्यान निता ढवण यांनी मिना दत्तात्रय मोरमारे यांचे पती दत्तात्रय निवृत्ती मोरमारे यांना एस.टी. डेपो शिवाजीनगर पुणे येथे पुन्हा कामावर रुजु करुन देते असे म्हणुन मिना मोरमारे यांकडुन १ लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेवुन निता ढवण यांनी दत्तात्रय निवृत्ती मोरमारे यांना कामावर रुजु न करता घेतलेले पैसे ही परत केले नाहीत. मिना मोरमोरे यांची आर्थिक फसवणुक करण्यात आली.
गुन्ह्याचा पुढील तपास घोडेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चव्हाण करीत आहेत.