आय मिरर
केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार ‘नाफेड’च्या वतीने चना (हरभरा) खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. सदर चना (हरभरा) प्रतिक्विंटल ५३३५ रुपये या हमीभावाने खरेदी होणार आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्याशी संलग्नित असलेली कृषीसखी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड इंदापूर यांनी केले आहे.
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावयाची असल्याने नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड, ७/१२ उतारा, ऑनलाइन पीक पेरा, बँकेचे पासबुक IFSC कोडसह झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी कागदपत्रे शेतकऱ्यांनी सादर करणे आवश्यक आहेत. तरी हरभरा शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
‘नाफेड‘ हरभरा खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाच्या निकषाप्रमाणे स्वच्छ व वाळवून आणावा, अशी माहिती कंपनी व्यवस्थापक यांनी दिली. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीसखी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड इंदापूर कडून करण्यात आले आहे.हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी माहितीसाठी गणेश यांच्याशी ८७९३९४०१०२ सदरील भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.