इंदापूर || उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्यातून इंदापूर तालुक्याला 5 टी.एम.सी.देण्याच्या सर्व्हेक्षण आदेशाला स्थगित देण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्याची घोषणा केली. त्यानंतर तसा लेखी आदेश ही सोलापूर करांना मिळाला.काढलेला आदेश रद्द केल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले त्यानंतर पुढे काय होणार? असा प्रश्न पडला असताना आता हे प्रकरण एका नव्या वळवणार येऊन पोहचलयं.
या सर्व प्रकरणावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीने धरणे आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला असून युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे उजनी धरण तरटगांव हद्दीतील गेट समोर गुरुवार दि.03 जून पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.सदर आशयाचे निवेदन त्यांनी सोमवरा दि.31 रोजी तहसीलदार अनिल ठोंबरे यांना दिले आहे.

इंदापूर तालुक्याती 22 गावांना 5 टि.एम.सी.पाणी मंजुरी मिळाली होती, नंतर ती रद्द करण्यात आली. त्याचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. शिवाय उजनी धरणातून मराठवाडयासाठी जाणारा पाण्याचा बोगदा (मार्ग) हा तात्काळ बंद करण्यात यावा. उजनी धरणामध्ये मराठवाडयासाठी 21 टि.एम.सी. ची तरतुद व चालू असलेले 7 टि.एम.सी. पाणी हे तात्काळ रदद करण्यात यावे.उजनी धरणामधून नदी कॅनाल (बोगदा) 8 माहीची परवानगी असताना जे जादा बेकायदेशीर पाणी सोडण्यात येते ते तात्काळ बंद करण्यात यावे.उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात वाटप झालेल्या जमिनी धनदांडग्यांनी दमदाटी करून वहिवाटीस अडथळा निर्माण करून जमिनी खरेदी करून घेतल्या त्या जमिनीच्या खरेदी रद्द करण्यात याव्यात अशा अग्रणी मागण्या त्यांनी केल्या आहेत.