इंदापूर || इंदापूर तालुक्याला उजनीत येणाऱ्या सांडपाण्यातून 5 टी.एम.सी. पाणी देण्यासंदर्भात सर्व्हेक्षण करण्याकरिता जो आदेश काढला होता तो सोलापूरकरांच्या प्रचंड विरोधानंतर दि.24 मे रोजी रद्द करण्यात आला.त्यानंतर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ते इंदापूर तहसील कार्यालयासमोर बुधवार दि.16 रोजी साधारण 4 च्या दरम्यान उपस्थित राहिले मात्र त्याच वेळी इंदापूर पोलिसांनी प्रभाकर देशमुख व त्यांच्या काही सहकार्यांना तात्काळ अटक करीत ताब्यात घेतले
सध्या प्रभाकर देशमुख इंदापूर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले आहे.सध्या ही आंदोलक मंडळी इंदापूर पोलीसांच्या ताब्यात आहेत.
प्रभाकर देशमुख इंदापुर मध्ये दाखल होणार या पार्श्वभूमीवर इंदापूर तहसील प्रशासन या ठिकाणी आज सकाळपासून शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या दांडा आंदोलनाला प्रभाकर देखमुख शह देणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.अखेर प्रभाकर देखमुख सायंकाळी चार च्या दरम्यान इंदापूर तहसील कार्यालय या ठिकाणी दाखल झाले,तो इंदापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.