इंदापूर : आय मिरर
इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2022 अंतर्गत गुरुवार १ डिसेंबरला अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी पर्यंत डिसेंबर १ अखेर २६ ग्रामपंचायत पैकी २५ ग्रामपंचायत मधून सरपंच पदाकरीता ७० अर्ज तर २६ ग्रामपंचायत मधून सदस्य पदाकरिता ३८८ अर्ज दाखल झाले आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी दिली.
सदस्य पदासाठी कोणत्या ग्रामपंचायत मधून किती नामनिर्देशन :
माळवाडी – १५ अर्ज , पिंपरी खुर्द-शिरसोडी- १३ अर्ज, बिजवडी- १४ अर्ज , डाळज नं.२ – १८ अर्ज,डाळज नं.३ – १७ अर्ज, डाळज नं.१- १९ अर्ज, न्हावी- १४ अर्ज,कळाशी – २० अर्ज,मदनवाडी- २४ अर्ज,लाखेवाडी- ३१ अर्ज ,बोरी१५ अर्ज, रेडणी – २५ अर्ज व बेलवाडी- ६ अर्ज पडस्थळ ९, हिंगणगाव – ७ ,अजोती सुगाव – ८ . झगडेवाडी – १६, थोरातवाडी – २६, रणमोडवाडी-८, जांब -६, मानकरवाडी -९, कुरवली -१६, म्हसोबावाडी -९, बेलवाडी – ६, डिकसळ – २१, गंगावळण – ८, सराटी- १४ असे ३८८ अर्ज हे सरपंच पदासाठी दाखल झाले आहेत.
सरपंच पदासाठी कोणत्या ग्रामपंचायत मधून किती नामनिर्देशन :
हिंगणगांव मधून -३ , अजोती सुगाव मधून -३ ,माळवाडी मधून – ५ पिंपरी शिरसोडी मधून २ ,बिजवडीतून – २ , झगडेवाडीतून – ७ , डाळज नं.२ मधून – ३ ,डाळज नं.३ मधून – ३ ,डाळज नं.१ मधून – ८, न्हावी मधून – १ , थोरातवाडी मधून – ४, कळाशी मधून ३, रणमोडवाडी मधून २, जांब मधून १,कुरवली मधून ३ , म्हसोबावाडी मधुन १, मदनवाडीतून – ५ ,लाखेवाडीतून – २ ,बोरीतून – ३ , रेडणीतून – ५, बेलवाडी मधुन १, डिकसळ मधून – ३ व सराटी मधून १ पडस्थळ मधुन ३, गंगावळण मधून १ असे एकूण ७० अर्ज दाखल झाले आहेत. आज शुक्रवारी २ डिसेंबर अर्ज दाखाल करण्याचा शेवटचा दिवस आहे.