आय मिरर
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत ०८ मार्च रोजी दुपारी ०४ वाजताच्या दरम्यान भवानीनगर हद्दीतील फिर्यादी सौ.सुवर्णा बाबासाहेब पाटील यांच्या घरी एका अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती.या घटनेत ८१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी झाला होता. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार वालचंद नगर पोलीस ठाणे अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
वालचंदनगर पोलीसांनी अत्यंत कौशल्याने चोवीस तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावुन गोपनीय बातमीच्या अनुषंगाने यातील कृष्णप्पा मुतप्पा बगले वय ३२ वर्षे रा. भवानीनगर ता. इंदापूर, जि. पुणे मुळ रा. सोलापुर यास अटक केली असून त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.या गुन्ह्यात त्याचा आणखीन एक मुख्य साथीदार असल्याचे त्याने सांगितले असून पोलीस गुन्ह्यातील गेले मालाचा व साथीदाराचा शोध घेत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवालदार मोहिते करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पो.उप निरीक्षक अतुल खंदारे, सहा.फौजदार तावरे,पो.हवा. मोहिते, पो.हवा विनोद पवार, पो.शि. किसन बेलदार यांच्या पथकाने केली.