आय मिरर
वडापुरी (ता. इंदापूर) येथील श्री हनुमान मंदिरात रामनवमी निमित्त राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.रामनवमी निमित्त सकाळपासून श्री. हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,सकाळी पुजा करण्यात आली, दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत घनश्याम देवकर यांचे
राम जन्मोत्सवाचे फुलाचे कीर्तन झाले, दुपारी बारा वाजता फुले टाकल्यानंतर आरती झाली. या नंतर महिलांनी राम जन्माचा पाळणा म्हणल्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हा महाप्रसाद जगदाळे कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी मंदिराचे पुजारी वैभव भारती- गोसावी यांच्या हस्ते आरती झाली, यावेळी किरण गोसावी ,चंद्रकांत गोसावी, नितीन भारती, दत्तात्रय शिर्के, काका देवकर,इंद्रनील देशमुख, शहाजी जगदाळे राजू जगदाळे मुकेश जगदाळे, रणजीत गिरी-गोसावी सह हजारो ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अवसरी, बेडसिंग, बाभूळगाव काटी, रेडा, पंधारवाडी, राऊतवस्ती ,रामवाडी या परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.