“महिलांच्या सबलीकरणासाठी व आरोग्य वर्धनासाठी जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केले जातील.सर्व डाॅक्टरांना सोबत घेऊन डाॅक्टर आणि जनता यातील असणारी दरी कमी करण्यासाठी लोकसेवेसाठी आम्ही काम करीत राहू.” – डाॅ.शिवाजीराव खबाले,सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर
इंदापूर : आय मिरर
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर कार्यकारणीच्या निवडी नुकत्याच पार पडल्या असून यामध्ये तालुकाध्यक्ष पदी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांची निवड झाली. तर सचिव पदी स्त्री रोग तज्ञ डाॅ.शिवाजीराव खबाले व डाॅ.राकेश कर्डिले यांची निवड करण्यात आली.
इंदापूर शहरातील डॉ. नितू मांडके सभागृहात इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र व अकलूजचे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष कार्यक्रमात ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसिध्द बालरोग तक्ष डाॅ.एल.एस. कदम व प्रसिध्द स्त्री रोग तक्ष डाॅ.संजय देशमुख यांनी कामकाज पाहिले.
निवडण्यात आलेल्या नुतन कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष पदी डाॅ.अनिल शिर्के,डाॅ.रोहिदास थोरवे यांची वर्णी लागली आहे.तर खजिनदार पदी डाॅ.महेश रुपनवर यांची निवड करण्यात आली.संचालक पदी डाॅ.सुधीर तांबिले, डाॅ.अतुल वणवे, डाॅ. ऋषिकेश गार्डे, डाॅ.अमोल रासकर, डाॅ.अभिजित ठोंबरे,डाॅ.रोहित कांडलकर,डाॅ.सचिन बिचुकले,डाॅ.नितीन लोंढे यांची निवड करण्यात आली.तर महिला संचालिका पदी डाॅ.सौ. कल्पना खाडे आणि डाॅ.सौ.सविता पोमणे यांची निवड करण्यात आली.
यावेळी डॉ. राम आरणकर, डॉ. अविनाश पाणबुडे, डॉ. संजय हेगडे, डॉ. वसंत दगडे, डाॅ.श्रेणिक शहा, डाॅ.किसन शेंडे व इतर वैद्यकीय व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.