भिगवण : निलेश गायकवाड
सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या पीकअपला इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे मदनवाडी उड्डाण पुलावर अपघात झालाय. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गोमांस घेऊन जाणारा पिकअप महामार्गावर पलटी होऊन त्यातील जनावरांचे मांस अक्षरशः महामार्गावर छिन्न विछीन्न अवस्थेत विखुरलं गेलयं.ही घटना पाहुन नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.या अपघातामुळे महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केलीय.
पुणे च्या दिशेने पिक अप क्रमांक एम.एच 03 डीव्ही 1799 मधून गोमांस वाहून नेले जात होते. सकाळी ठीक 8 वाजण्याच्या सुमारास या पिक अप ला भिगणव मधील मदनवाडी उड्डान पुलावर अपघात झाला.यात हे पिक अप वाहन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उलटले गेले. या घटनेनंतर वाहन चालक पसार झाला असून या संदर्भात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.हे मांस कुठून आलं कोठे निघालं होतं या संदर्भातील सखोल तपास पोलीस करणार असल्याचे भिगवणचे प्र.सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले आहे.