इंदापूर : आय मिरर
शरद पवार यांसारखा नेता या देशात नाही,पवार साहेबांनी सर्वांसाठी काम केलयं.त्यामुळे इंदापूर मधील शरद कृषी महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल.असा विश्वास माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याच्या इंदापूर मध्ये ०८ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे.गुरूवारी दि.०८ डिसेंबर रोजी आमदार दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभ हस्ते याचा उद्घाटन होणार आहे.
दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी ०७ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी भेट देत उभारण्यात आलेल्या शामियाण्याची पाहणी केली यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ,तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, नगरसेवक अमर गाडे,गजानन गवळी,पोपट शिंदे,अनिकेत वाघ,राहुल गुंडेकर,अनिल राऊत,संदेश देवकर,संजय देवकर,संजय रुपनवर,वसिम बागवान, ओंकार सरडे आदी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शन आणि शेतकरी मेळावा शेतकरी मेळावा हा भव्य असा कार्यक्रम इंदापूर येथे नवीन नगरपालिकेच्या शेजारच्या मैदानात आठ ते बारा डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे नवीन उपक्रम, शेतीमध्ये झालेली सुधारणा, त्यामध्ये मिळालेले उत्पन्न अशा अनेक बाबी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे जे स्वतः चांगल्या प्रकारची शेती करतात त्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन राहणार आहे. शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञ देखील मार्गदर्शन करणार आहेत. आपण नऊ डिसेंबर ला महिलांचा मेळावा घेतलेला आहे. दहा तारखेला युवक महोत्सव घेतला आहे.