इंदापूर : आय मिरर
इंदापूर शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगवर इंदापूर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई केलीय. इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावरती इंदापूर पोलिसांनी वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरणाऱ्या दुचाकी जप्त केल्यात.तर विना नंबरच्या वाहनांवर हि पोलीसांनी दंडात्मक कारवाई केलीय…पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत ९५ गुन्ह्यातून 55 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पो.हवा. राकेश फाळके,पो.हवा. सचिन बोराटे,पो.काॅ.अर्जुन नरळे, पो.काॅ.अमोल खाडे,पो.काॅ.अकबर शेख आणि पो.काॅ.विक्रम जमादार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.