आय मिरर
इंदापूर शहरातील महतीनगर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या सराईत गुन्हेगारांना इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंदापुरातील महतीनगर परिसरात घरपोडी करण्याच्या उद्देशाने हे गुन्हेगार आले असता गुरूवारी १२ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा घरफोडीचा डाव फिस्कटना हे अट्टल गुन्हेगार थेट इंदापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
या संदर्भात पो.हवा.प्रविण बाबासाहेब भोईटे यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीसांत आरोपी सुमित दगडु गर्गेवाड वय २३ वर्षे रा. मळवटी रोड, सिध्देश्वरगनर, लातुर जि.लातूर आणि शंभु विक्रम बुधवाडे वय २० वर्षे रा. बाभुळगाव ता. बाभुळगाव जि.लातुर यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील आरोपींना इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. सदर आरोपींनी विरोधात लातूर,उस्मानाबाद या पोलीस ठाण्यांसह कर्नाटक राज्यात देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सविस्तर हकीकत अशी की,गुरूवारी रात्री पो.गवा. प्रविण भोईटे, पो.काँ.प्रवीण शिंगाडे, पो.काँ.समाधान केसकर हे रात्रगस्त साठी इंदापुर शहर हद्दित निघाले होते.दरम्यान महतीनगर भागात दोन संशयित इसम पोलीसांच्या निदर्शनास आले.त्यांच्याकडे एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल ही होती. पोलीसांची चाहुल लागताच त्यांनी तेथुन पळ काढला. त्यावेळी भोईटे, शिंगाडे आणि केसकर व वैभव अशोक शेंडे,अतुल बलभीम आरणे, प्रताप बाबासाहेब भोईटे यांच्या मदतीने या आरोपींचा पाठलाग करून त्यापैकी दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. त्यांचे ताब्यातील बजाज कंपनीची काळया रंगाची पल्सर मोटारसायकल क्रमांक MH 24 BQ 9220 पोलीसांनी जप्त केली आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी व इंदापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.