आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा करण्यात आला आहे. आय कॉलेजमधील विद्यार्थ्यांना इंदापूर पतंजली योग समितीच्या वतीने सूर्यनमस्कार घालत योगा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.
रथसप्तमी ‘जागतीक सुर्यनमस्कार दिवस’ सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प दिवस म्हणून साजरा केला जातो. इंदापूर पतंजलि योग समितीच्या वतीने पहाटेच्या योगवर्गामध्ये सामुहिक सुर्य नमस्कारातुन राष्ट्रवंदना करीत स्वस्थ निरोगी भारतासाठी सुर्य नमस्कार घेण्यात आले.
युवा भारतच्या वतीने कला आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आणि प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार या सर्वांगसुंदर व्यायामाची शास्रोक्त माहीती देण्यात आली.मंत्रोच्चारासह ,श्वास आणि उच्छवास याचे मार्गदर्शनही करण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांची सुर्यनमस्काराची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना निरोगी निरामय आरोग्यासाठी योगासने प्राणायम याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रशांत गिड्डे ,रविंद्र परबत,ओंकार दोंड, चंद्रकांत देवकर, काशीनाथ पारेकर मल्हारी घाडगे यांनी मार्गदर्शन केले.