आय मिरर
रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या माध्यमातून इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तराबाई श्रीपती कदम विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले. यामध्ये तब्बल 550 हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. इंदापूर रोटरी चे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुधीर तांबिले आणि डॉक्टर यतिन शिंदे यांच्या सहकार्यातून ही तपासणी करण्यात आल्याचं रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी सांगितले.
यावेळी इंदापूर रोटरीचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, मेडिकल डायरेक्टर डॉ.सुधीर तांबिले,मेडिकल को.डायरेक्टर डॉ.यतिन शिंदे,रोटरीचे सचिव सुनिल मोहिते,खजिनदार नितीन शहा,धरमचंद लोढा,नंदकुमार गुजर,भिमाशंकर जाधव,मनोहर बेंद्रे,प्रमोद भंडारी आदी उपस्थित होते.