आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये ०७ मार्च रोजी सायंकाळी काटी येथे वीज कोसळून भरतवाडी येथील एका बावीस वर्षीय तरुण युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली होती. ओंकार दादाराम मोहिते या तरूणाचा यात मृत्यू झाला होता. यानंतर शासनाकडून मोहिते कुटुंबियांना आर्थिक स्वरूपात सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी स्वतः मोहिते कुटुंबियांच्या घरी भेट देऊन शासमाकडून देण्यात येणारा सानुग्रह अनुदानाचा धनादेश मयत ओंकार च्या आई-वडिलांकडे स्वाधीन केला.
ओंकार आपल्या शेतामध्ये कामानिमित्त गेला असताना रात्री उशीरा वीज कोसळली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या.मंगळवारी ०७ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान पावसाची रिमझिम सुरू झाली होती.याच वेळी वीज कोसळून इंदापूर तालुक्यातील काटी येथील ओंकार मोहिते या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.हा तरुण पोलीस भरतीची तयारी करत होता.