पुणे || मोदी सरकारचा हा सातवा अर्थ संकल्प होता. सर्वसामान्य लोकांची अपेक्षा होती की हे सरकार हळूहळू कर आखणी कमी करेल. नोकरी आणि व्यावसाय संदर्भात अपेक्षा जास्त होत्या पण बजेट पहिल्यानंतर निराशा आली आहे. देशात शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कष्ट केले साहजिकच शेतकऱ्यांच्या अपेक्षा असणार की अधिक गुंतवणूक करण्याची अपेक्षा होती. पण, त्याची पूर्तता झाली नाही शेती प्रश्नांवर लक्ष घालणारे जे घटक आहेत त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेतली तर त्यांची निराशा झाली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी दिलीय.
शरद पवार म्हणाले की,काही लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा वायदा केला आहे. पण, गेल्या 2 ते 3 वर्षात प्रती वर्षी इतक्या नोकऱ्या देऊ तितक्या नोकऱ्या देऊ असं सांगितले जाते पण त्याची पूर्तता होत नाही. पाठीमागचा अनुभव बघितला तर सरकारवर विश्वास ठेवण्यासासारखी परिस्थिती नाही. बजेट हे गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं असलं पाहिजे, अधिक हाताला काम देणारं असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला ज्या दैनंदिन जीवनात वस्तू लागतात त्याच्या किमती नियंत्रण ठेवून महागाईला आटोक्यात आणण्यासाठी बजेट मध्ये तरतूद असायला पाहिजे परंतु याची पूर्तता बजेटमध्ये झालेली दिसत नाही.