इंदापूर : आय मिरर
इंदापूर शहरांमध्ये वाढत चाललेल्या डेंगू व चिकनगुनिया च्या साथीमुळे इंदापूर शहराची जनता हैराण झाली आहे. इंदापूर शहरातील सर्व रुग्णालय पूर्ण क्षमतेने डेंगू व चिकनगुनिया च्या रुग्णांनी भरलेली असून शासन स्तरावर याची गंभीर दखल घ्यावी. तात्काळ ही वाढती महामारी योग्य त्या उपाययोजना राबवून आटोक्यात आणावी अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत यांच्या स्वाक्षरीने इंदापूर नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना हे निवेदन देण्यात आलं आहे.नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख मनोज बारटक्के आणि कार्यालयीन अधिकारी वर्षा क्षीरसागर यांनी हे निवेदन स्वीकारलं आहे.
वाढत्या रुग्णसंखेवर इंदापूर काँग्रेसने चिंता व्यक्त केली असून प्रशासनाचे लक्ष याकडे वेधलं आहे.प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवून इंदापूर शहर रोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत सध्या इंदापूर शहरांमध्ये डेंगू आणि चिकनगुनियाचे रुग्ण प्रचंड वाढत असून तात्काळ यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जाकीर काझी,शहर काँग्रेस अध्यक्ष चमनभाई बागवान,तालुका कार्याध्यक्ष काका देवकर,अनुसूचित जाती जमाती विभाग अध्यक्ष युवराज गायकवाड, समीर शेख,अशोक बोडके,नागनाथ भंडलकर,अलंकार भंडलकर आदी उपस्थित होते.