इंदापूर : आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तने राष्ट्रावादी काँग्रेस इंदापूर कडून दि.८ ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत इंदापूर मध्ये भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा अर्थात शरद कृषी महोत्सव २०२२ पार पडणार आहे.इंदापूर शहरातील १०० फुटी रोड वर नवीन तहसिल कचेरी शेजारी असलेल्या मैदानात हा महोत्सव पार पडणार असून आज मंगळवारी या महोत्सवानिमित्त या मैदानाचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते आणि जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य सचिन सपकळ यांच्या उपस्थितीत पार पडले आहे.यावेळी बाजार समितीचे संचालक सचिन देवकर,विठ्ठल महाडिक,नाना बोराटे, समाधान शिंदे,गनीम सय्यद आदी उपस्थित होते.
मैदान पूजनानंतर मान्यवरांनी या ठिकाणची सर्व ती पाहणी करून होणाऱ्या शदर महोत्सवानिमित्त सविस्तर माहिती घेतली. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत अशा सूचना यावेळी तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी सबंधितांना दिल्या.
या राज्यस्तरीय शरद कृषि महोत्सवात २०० पेक्षा अधिक स्टाॅल असतील. महाराष्ट्रातील कृषि क्षेत्रातील सर्व महत्वाच्या कंपन्यांचा या मध्ये सहभाग असणार आहे.शेतातील आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकरी वर्गाला पाहता येणार आहे.शेतकरी वर्गासाठी विविध परिसंवाद आणि चर्चासत्रे हि आयोजित करण्यात आली आहेत.