इंदापूर : आय मिरर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रात राबविलेल्या योजना व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात होत असणारा विकास जनसामान्यात पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे.असे मत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधण्यासाठी ते सोलापूर येथे जात असताना शुक्रवारी ०२ डिसेंबर रोजी त्यांनी इंदापूर येथे कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शेखर पाटील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
मोहोळ म्हणाले की,येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची जबाबदारी इंदापूर तालुक्यातील व शहरातील युवकांनी पार पाडावी.
इंदापूर शहर हे मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र नगरी आहे या वेळी मोहळ यांनी मालोजीराजे यांच्या स्मृतीस अभिवादन केले.या वेळी माजी नगरसेवक शेखर पाटील,भारतीय जैन संघटना अध्यक्ष प्रकाश बलदोटा,नितीन मस्के,किशोर बागल,निलेश शिंदे,निलेश बोरा उपस्थित होते.