मुंबई || मुंबईत एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. तिने आरोपीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आरोपीने बँकिंग अधिकारी असल्याचा दावा करुन आपली फसवणूक केली. लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप या महिला पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. शुक्रवारी पवई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे वृत्त सौ सकाळ बने दिले आहे.
पीडित महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. पीडित महिलेने तक्रारीमध्ये आणखी दोघांची नावे घेतली आहेत. अन्य दोन जण आपल्याला धमकावून ब्लॅकमेलिंग करत असल्याचा महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप आहे.एका वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याला या गोष्टीचा सामना करावा लागत असेल तर समाजातील महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थितीत होत आहे.