आय मिरर (विजयकुमार गायकवाड)
भिगवण येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपर्क कार्यालयास वैद्यकीय मदत कक्षाचे ब्रँड अँबेसिडर तसेच गुहाटी डायलॉग स्पेशल आमदार शहाजी पाटील यांनी रविवारी भेट दिली.या भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी इंदापूर तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचसोबत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्गदर्शक सूचनाफलकाचे अनावरण व सोशल मीडिया प्रमुख शिवश्री भूषण सुर्वे, पुणे उपजिल्हा वैद्यकीय सहाय्यक विशाल धुमाळ, भिगवन शहर वैद्यकीय सहाय्यक राहुल ढवळे, यांच्या कार्याहवालाचे प्रकाशन शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गणेश थोरात, निलेश गायकवाड,अमित देवकाते, संजय बंडगर पप्पू महाराज गायकवाड, विशाल बंडगर नवनाथ सुतार, अविनाश ढवळे, सौरभ वनवे, दिनेश भोईटे, विकास ढवळे अक्षय धुमाळ, सोनू वाघमोडे, बाबू आढाव उपस्थित होते.
यावेळी शहाजी पाटील यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या चाललेल्या कामाचे तसेच कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांचे तोंड भरून कौतुक केले. प्रत्येक रुग्णापर्यंत मदत कशी पोहोचवता येईल हे मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून आपण पहात आहात असे उद्गार यावेळी पाटील यांनी काढले.