आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्याच्या हद्दीत चौफुला येथे बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी आहेत, बुधवारी १ फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असुन या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या चार मृतांमध्ये २ पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचाही यात मृत्यू झाला आहे. यामुळे तीन पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंबे या अपघातात उध्वस्त झाली आहेत.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. तर टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर ही बस आदळून हा अपघात झाला. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली आहे.अपघातातील जखमींना नजिकच्या दवाखान्यात तर काहींना पुण्याला हलविण्यात आले आहे.