• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Friday, March 31, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना न्याय – हर्षवर्धन पाटील

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
March 9, 2023
in महाराष्ट्र
0
अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना न्याय – हर्षवर्धन पाटील

आय मिरर

राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मिळणाऱ्या रु.6000 रक्कमे बरोबर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून रु.6000 ची रक्कम देण्याची अतिशय स्वागतार्ह घोषणा अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच एसटी प्रवासामध्ये महिलांना 50 टक्के तिकीट सवलत मिळणार आहे. शेतकरी व महिलांच्या विकासाच्या अनेक नाविन्यपूर्ण योजना अर्थसंकल्पात असून, या अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी स्वागतार्ह प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.9) दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना- भाजप युती सरकारचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. अतिशय अभ्यासपूर्ण व दूरदृष्टीचा हा अर्थसंकल्प असल्याचे गौरवद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

नमो शेतकरी महासन्मान योजनेतून रु. 6 हजार देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करून व त्यासाठी रु. 6900 कोटींची तरतूद केल्याने आता शेतकऱ्यांना प्रतिवर्षी रु.12 हजार एवढी रक्कम मिळणार आहे. तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आता फक्त रु.1 भरून मिळणार आहे. तसेच मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे व फळबागा, ठिबक सिंचन, अस्तरीकरण आदी योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच महा कृषी विकास अभियान योजना जाहीर करून पाच वर्षासाठी या योजनेसाठी रु. 3 हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील सुमारे 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीकडे आणण्याचे धोरण जाहीर केले आहे. तर अपघातग्रस्त शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेतून रु. 2 लाख निधी दिला जाईल. तसेच तालुक्याचे ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येणार असून, तिथे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शिव भोजन थाळी उपलब्ध करून दिली जाईल आदी अनेक योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्यामध्ये 500 वसतिगृह केंद्राच्या मदतीने उभारण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन वाढविले आहे . तसेच मुलींसाठी लेक लाडकी या नवीन योजनेची व राज्यातील 4 लाख महिला व मुलींची आरोग्य तपासणी करून त्यांचेवर उपचार केले जातील, अशी घोषणाही अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

जलयुक्त शिवार योजना-2, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी निरंतर सेवा, नुकसानीचे इ पंचनामे, दीड लाख शेतकऱ्यांना सौर पंप, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा रु.1.5 लाखावरून रु. 5 लाख करणे, मच्छीमारांना रु. 5 लाखापर्यंतचे मोफत विमा संरक्षण, मराठा-धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजनांबरोबरच लिंगायत, गुरव, रामोशी, वडार या समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करणे, अल्पसंख्याक समाजासाठी बचत गट स्थापन करणे, शिष्यवृत्तीत वाढ करणे, श्रावणबाळ व इतर योजनांचे मासिक अनुदान रु.1000 वरून 1500 करणे, कीर्तनकारांसाठी सन्मान योजना, राज्यामध्ये 75 हजार जागांची भरती, गड किल्ले संवर्धनासाठी रु.300 कोटीची तरतूद आदी अनेक योजना जाहीर करून शिवसेना-भाजप सरकारने समाजातील सर्व घटकांना पूर्णपणे न्याय दिला आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

Views: 409
Share

Related Posts

मार्गदर्शक मित्र हरपला – हर्षवर्धन पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा
महाराष्ट्र

मार्गदर्शक मित्र हरपला – हर्षवर्धन पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा

March 29, 2023
लढवय्या नेता हरपला ! पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन
महाराष्ट्र

लढवय्या नेता हरपला ! पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

March 29, 2023
“महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागलीय” आमदार गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
महाराष्ट्र

“महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागलीय” आमदार गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

March 27, 2023
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची आज इंदापूरात जाहिर सभा ; बावनकुळे काय बोलणार याकडे लागली सर्वांची नजर
महाराष्ट्र

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची आज इंदापूरात जाहिर सभा ; बावनकुळे काय बोलणार याकडे लागली सर्वांची नजर

March 26, 2023
मोदी सरकार हाय हाय ! इंदापूर तहसील समोर काँग्रेसची निदर्शने
महाराष्ट्र

मोदी सरकार हाय हाय ! इंदापूर तहसील समोर काँग्रेसची निदर्शने

March 24, 2023
तिच्या अंगावरची हळद अजून ओलीच होती ! तोच तिने घेतला अखेरचा श्वास ; तिच्या जाण्याने झालेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.…
महाराष्ट्र

तिच्या अंगावरची हळद अजून ओलीच होती ! तोच तिने घेतला अखेरचा श्वास ; तिच्या जाण्याने झालेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.…

March 24, 2023
Next Post
फक्त 24 तासाच्या आत वालचंदनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या ! वाचा काय घडलं होतं भवानीनगर परिसरात

फक्त 24 तासाच्या आत वालचंदनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या ! वाचा काय घडलं होतं भवानीनगर परिसरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • बिगुल इंदापूर बाजार समितीचं ! चौथ्या दिवशी दाखल झाले बारा अर्ज ; ३ एप्रिल नामनिर्देशनासाठी अखेरचा दिवस
  • दत्तामामांनी तालुक्यासाठी पुन्हा एकदा आणला घसघशीत निधी ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळाले तब्बल १३.१३ कोटी
  • काटी येथील मोहिते कुटुंबाला शासनाकडून देण्यात आला चार लाख मदतीचा धनादेश ; वीज कोसळून मुलाचा झाला होता मृत्यू
  • वडापुरीतील हनुमान मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!