आय मिरर
अर्थसंकल्पातून धनगर समाजाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. धनगर समाजासाठी महाराष्ट्र मेंढी , शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार असून, समाजासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची तरतुद करण्यात आली आहे.या निर्णया बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे यांनी धनगर समाजाच्या वतीने आभार मानले आहेत.
धनगर ऐक्य परिषदेने धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी डाॅ.शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या इंदापूर मध्ये तीव्र आंदोलन छेडले होते. याची दखल घेत ०५ डिसेंबर २०२२ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी धनगर ऐक्य परिषदेच्या कार्यकर्त्यांबरोबर मंत्रालयाच्या दालनात तातडीची बैठक घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेनुसार धनगर समाजाच्या विकासासाठी 22 योजना व त्या योजनांसाठी 1000 कोटीची तरतूद करण्यात येईल असा शब्द दिला होता.