आय मिरर
गोबर गॅसच्या टाकीमध्ये कालवलेल्या शेण काल्यामध्ये बारामती तालुक्यातील खांडज येथील चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडील आणि चुलत्या बरोबरच शेजारी व्यक्तीचा सुध्दा मृत्यू झाला आहे.प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहूजी गव्हाणे अशी मृतांची नांवे आहेत.
ही घटना घडल्यानंतर तातडीने त्यांना बारामती मधील सिल्वर जुबिली या शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश जगताप यांनी या संदर्भातील अधिक माहिती दिली.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आणि अनेकांना धक्का बसला. एकाच कुटुंबातील तिघा जणांचाया घटनेत जीव गेला आहे. बारामती तालुक्यातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे