आय मिरर
इंदापूरच्या जनतेने वीस वर्ष अलंकार रुपी तालुका तुमच्या हातात दिला.त्याचा तुम्ही नाश करुन टाकला. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विकास करता आला नाही त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी नाव न घेता भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वरती भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी 24 मार्च रोजी टीका केली होती या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी शनिवारी 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.
यावेळी विरोधीपक्ष नेता पोपट शिंदे,गट नेता गजानन गवळी,नगरसेवक अमर गाडे,अतुल शेटे-पाटील,दादासाहेब सोनवणे,वसंतराव मालुंजकर,श्रीधर बाब्रस,राजेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.
ढवळे म्हणाले की, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर खोटे बोलतात अशी टीका केली, मात्र यापुढे अशा टीकाटिपणी केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. इंदापूर नगर परिषदेला विकास कामासाठी मिळालेला 15 कोटींचा निधी यासाठी अगोदर भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांचे पत्र गेले आणि त्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांचे पत्र गेले असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र या कामासाठी इंदापूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रत्येक वेळी ठराव मंजूर केले आहेत या ठरावावरून टी एस देखील केला आहे. पुण्याला जाऊन हेलपाटे मारण्यापासून ते टी एस करण्यापर्यंत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काम केले आहे. ज्यावेळी आमदार भरणे मंत्रीपदावर होते त्यावेळी मंत्री आपल्या दारी हा उपक्रम इंदापूर शहरात राष्ट्रवादीकडून राबविण्यात आला होता त्यावेळी तुमची नेमकी काय मागणी आहे हे जाणून घेऊनच त्या मागणीनुसार ही कामे मंजूर केली आहेत असं ढवळे म्हणाले.
आमदार दत्तात्रय भरणे हे 2014 पासून पुणे जिल्हा नियोजन मंडळावरती आहेत तुमचे नेते साधारण या चार दोन महिन्यात नियोजन मंडळावरती आहेत. लोकांची गरज जाणण्यासाठी आमचा नेता जनतेच्या दारात गेला तुम्ही कोणाच्या दारात गेला ते आम्हाला सांगा ? लोकांना कधी विचारलं तुमची गरज काय तुमच्या अडचणी काय ? मंजूर करण्यात आलेल्या कामांची टी एस हे एक वर्षांपूर्वी झाले आहेत भाजपवाले आता दावा करतील की ते आता या चार महिन्यात झाले म्हणून मात्र प्रत्येक वर्षी नवीन डीएसआर लागू केला जातो आणि यासाठीच टी एस थांबवले जातात. असही ढवळे यांनी सांगितला आहे.
भारतीय जनता पार्टी दावा करते की ही कामे आम्ही आणले आहेत मग ती कामे तुम्ही आणली तर तुमच्याबरोबर पत्रकार परिषद घेताना नगराध्यक्ष का उपस्थित नव्हते असा सवाल ढवळे यांनी उपस्थित केला आहे. केवळ पत्र दिले म्हणजे काम मंजूर होत नाही त्यासाठी जनतेतून निवडून यावं लागतं. कामाचा ठराव मांडावा लागतो त्याचे एस्टिमेट करावे लागतं त्याचा टी एस करावा लागतो आणि नंतर ते काम मंजुरीला पाठवावे लागते.
वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या घरी संवर्धनात प्रतिक्रिया देताना भाजपवाले म्हणतात की त्या ठिकाणी वीस वर्षे तहसील कचेरी होती त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काम करू शकलो नाही. मात्र आमच्या बारामतीत पाचशे वर्षांपूर्वीच्या गढीत पोलीस स्टेशन चालतं, तरीही आमचा नेता काम करतो असा दाखला यावेळी ढवळे यांनी दिला आहे. तुम्हाला केवळ दुसऱ्याचं आपलं म्हणण्याची सवय लागली आहे. मागील चार दिवसात मंत्रालयातील दालनात पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांसोबत बैठक होणार होती, ती बैठक देखील हाणून पाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून झाल्याचा आरोप शहराध्यक्ष ढवळे यांनी केला आहे.
दलित वस्तीसाठी आलेल्या निधी वरती भाजप दावा करत आहे मात्र 2017 पासून त्या ठिकाणचे असणारे आमचे मखरे आणि सोनवणे हे नगरसेवक पाठपुरावा करत आहेत. आज तुम्ही विचारता की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनर वरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे फोटो का लावले. मात्र चंद्रकांत पाटील आम्ही घेऊन गेलेली कामे करतात आम्हाला ते सहकार्य करतात आज ते पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांचा फोटो लावणे आम्हाला बंधनकारक आहे यापुढे देखील आम्ही त्यांचा फोटो लावत राहणार असंही ढवळे यांनी स्पष्ट केले आहे.