इंदापूर : आय मिरर
महाराष्ट्र शासन कृषी विभाग,महात्मा फले कृषी विद्यापीठ आणि साखर कारखान्यांच्या संयुक्त विद्यमाने खोडवा ऊस उत्पादन व पाचट व्यवस्थापन संयुक्त अभियान राबवण्यात येत आहे.या अभियान अंतर्गत इंदापूर तालुक्यातील तरटगांव मधील दादासाहेब भांगे यांच्या शेतात शेतकऱ्यांनी खोडवा ऊसातील पाचट न जाळण्याची शपथ घेतली आहे. यासोबत एकरी शंभर टण ऊस उत्पादनाबाबत कृषि खात्याकडून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाबद्दल मार्गदर्शन केले.शिवाय ऊस पाचट न जाळण्याबाबत व खोडव्या उसाचे उत्पादन वाढण्यासाठी दादासाहेब भांगे यांच्या शेतावरती ऊस पाचटाची कुट्टी करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.तर मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनां संदर्भात माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब यादव यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचसूत्री चा वापर करण्यासाठी जमिनीची मशागत ,बेणे निवड , बेणे बदल, आंतर मशागत व फवारणीचा वापर करून ड्रीपद्वारे खते दिली तर नक्की शंभर टनाचा पल्ला गाठू शकतो हे आश्वासित केले. यावेळी कृषि सेवक प्रशांत मोरे यांसह कृषी विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.