इंदापूर : आय मिरर
बारामती ते सोलापूर जिल्ह्यात बावडा मार्गे अवैद्यरित्या कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या चारचाकी वाहनास इंदापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केलीय.
एका आयशर टेम्पो मध्ये निर्दयतेने कोंबून जनावरे नेत असल्याबाबत इंदापूर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती.त्यानुसार वालचंदनगर ते बावडा रोड वरती सापळा लावण्यात आला.या कारवाईत ११ जर्सी गाई व ०१ देशी गाय अशी एकूण १२ जनावरांची कत्तलीपासून मुक्तता करण्यात आली आहे.सुटका करण्यात आलेल्या बारा गाईंना पांजरपोळ्यामध्ये योग्य तो बंदोबस्तात जमा करण्यात आले.
आयशर टेम्पो चालक बंदेनवाज ख्वाजा शेख व त्याचा साथीदार रमजान ख्वाजाभाई शेख यांना इंदापूर पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अंदाजे ९६ हजार रुपये किमतीच्या एकूण बारा गाई व १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण १० लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या संदर्भात प्राणी संरक्षण अधिनियम व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.