“सीवायडीए, प्राज फाऊंडेशन व पंचायत समिती इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित,शिक्षक क्षमता विकसन कार्यशाळेचा लाभ इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार.” – विजयकुमार परीट,गटविकास अधिकारी
इंदापूर : आय मिरर
इंदापूर तालुक्यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी सीवायडीए ही संस्था मागील वर्षभरापासून काम करत असुन संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील ५१ शाळांमधून २२०० विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालय व जुनियर काॅलेज मध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील ५१ शाळांमधील १०२ शिक्षकांना मुंबई येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका व तज्ञ मार्गदर्शिका मीनल दिक्षीत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पायाभूत वाचन-लेखन, आकलन, मराठी,गणित व इंग्रजी विषयाची शैक्षणिक साहित्य निर्मिती,वापर व आनंददायी शिक्षण या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेत सीवायडीएच्या अनिता केदारी,प्रमोदिनी नाईक व प्राज फाऊंडेशनचे मंदार पोफळे यांनी मार्गदर्शन केले.सीवायडीए चे अमर हजारे,गोरक्ष गुरव,किरण यादव,रोहीत साळुंके यांनी कार्यशाळेचे नियोजन केले.
प्रशिक्षणार्थींच्या वतीने किरण म्हेत्रे,संतोष हेगडे,शशिकांत शेंडे,कंदमाला राऊत,मंदाकिनी हेंबाडे यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल मुगळे, केंद्रप्रमुख संभाजी आजबे,मारुती सुपूते,प्राचार्य आर डी चव्हाण,समन्वयक सतिश भोंग व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.