आय मिरर
तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणा-या सहा वेगवेगळ्या रस्त्यांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल १९.४१ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे.या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकर सदरील रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. ए तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जांब-उध्दट- मानकरवाडी-कर्दनवाडी रस्ता (लांबी ८|०० कि.मी)- रक्कम रू ५.७९ कोटी व बावडा-शेटफळ हवेली रस्ता(लांबी ६|६००कि.मी)-रक्कम रू५.३३ कोटी
या दोन कामांना जवळपास ११ कोटी १२ लक्ष इतका निधी प्राप्त झाला असून या कामांची निविदा प्रक्रियाही चालू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ जिल्हा वार्षिक योजनेमधून सुद्धा आपल्या तालुक्यासाठी चार रस्ते मंजूर झाले असून यामध्ये प्रजिमा-६५ न्हावी ते काळोखे वस्ती-मारकड वस्ती ते लोणी देवकर औद्योगिक वसाहत रस्ता.ग्रा.मा.९(लांबी २|४५० कि.मी)-रक्कम २कोटी ८ हजार रू,रा.म.९६५जी ते कारंडेमळा निमसाखर रस्ता (लांबी २|४७०कि.मी.)-रक्कम १.४६ कोटी,प्रजिमा १७० बोरी ते खंडोबा मंदिर-जोरी वस्ती हनुमान वस्ती ते काझड रस्ता(लांबी२|४०० कि.मी)-रक्कम रू२.१७कोटी आणि रा.म.९६५ जी ते तरंगवाडी ते बुनगेवस्ती, आंबेमळा रस्ता (लांबी ३|७३०किमी )-रक्कम रू २.६६ कोटी अशा प्रकारे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास ११.५५ किमीचे रस्ते मार्गी लागणार असून या कामांसाठी एकूण ८ कोटी २९ लक्ष ८ हजार इतका निधी मिळाला असल्याचे श्री.भरणे यांनी सांगितले.
भरणे पुढे म्हणाले की,या रस्त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये त्या-त्या भागातील नागरिकांची सातत्याने मागणी होत होती.त्यामुळे तालुक्याचा आमदार या नात्याने वरील कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून १९.४१ कोटी मंजूर करून आणले आहेत.हे रस्ते झाल्यानंतर या भागातील दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटून रस्त्यांचा अनुशेष तर भरून निघणार आहेच परंतु नागरिकांची रस्त्यांअभावी होणारी गैरसोयही टळणार असल्याचे निश्चितपणे समाधान आहे.
मात्र हे रस्ते मंजूर झाल्याचे समजताच आमच्या विरोधकांनी नेहमीप्रमाणे फुकटचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड सूरू केली आहे.त्यांना नाकर्तेपणामुळेच जनतेने घरी बसविले आहे.मात्र अधिकार नसताना सुद्धा ते सारखे कशातही लुडबुड करून चमकोगिरी करतात.मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून राजकीज पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भरणे यांनी केली आहे.तसेच तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे मंजूर करण्यासाठी मी सक्षम असून,’ए तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत येणाऱ्या काळात यापेक्षा मोठा निधी आपल्याला प्राप्त होणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.