आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक अपघात घडला आहे.यात्रेतील मनोरंजनाचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या युवकाची दुचाकी गतिरोधकावरून उडून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळ घडली आहे.धनंजय दामोदर धुमाळ वय २२ वर्षे रा.कुंभारगांव ता. इंदापूर असं अपघातात मयत झालेल्या बावीस वर्षीय युवकाचे नांव आहे.हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला.
पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावच्या हद्दीत सकुंडे वस्ती शेजारील सर्व्हिस रस्त्यावरील गतिरोधकावरुन दुचाकी उडाल्यामुळे हा अपघात झाला.यात धनंजय दामोदर धुमाळ याचा मृत्यू झाला तर भारत पांडुरंग पोंद्कुले वय 23 तसेच किशोर दत्तात्रय घोडके 22 रा.कुंभारगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेच्या माहितीनुसार, वरील तिन्ही तरुण हे कुंभारगाव येथून दुचाकीने (एमएच ४२ डीए ३८२०) डाळज येथील यात्रेला गेले होते. तेथील यात्रा कार्यक्रम उरकून ते पुन्हा भिगवणजवळील तक्रारवाडीच्या यात्रेत मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यास आले होते. रात्री एक वाजेच्या दरम्यान ते कुंभारगावकडे परत निघाले होते. सकुंडेवस्तीजवळ ते सेवा रस्त्याने जात असताना दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने तिघे खाली पडले. यामध्ये पाठीमागे बसलेला धनंजय धुमाळ याच्या मणक्याला व इतर भागाला जबर मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाला, तर इतर त्याचे दोन्ही मित्र जखमी झाले आहेत. दोघांवर भिगवण येथे उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समीर करे करीत आहेत.