इंदापूर : आय मिरर
पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर शहरानजीक सी.एन.जी.पेट्रोल पंप शेजारील एका विहिरीत एक अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. मंगळवारी दि.२० सप्टेंबर रोजी स्थानिक विहिर मालकाच्या निदर्शनास ही बाब आली त्यानंतर त्यांनी इंदापूर पोलिसांना याबाबत खबर दिली.
शिवाजी मारुती राऊत हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जनावरांना मक्याची वैरण आणण्यासाठी गेले होते.याच दरम्यान त्यांची अचानक विहिरीत नजर गेली.त्यावेळी त्यांना विहिरीतील पाण्यात महिलेचे प्रेत तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत इंदापूर पोलिसांना कळवण्यात आले.इंदापूर पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.सदर घटनेचा पंचनामा केला असून सदरील महिला ही विहिरीत पडून मृत पावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सदर महिला ही अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाची असून तिच्या अंगावर आकाशी रंगाची साडी आहे. तिची उंची 5 फूट रंग -सावळा, काळे केस आणि गोल चेहरा असे वर्णन आहे.
सदर महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून सबंधित महिला कोणाच्या ओळखीची असल्यास इंदापूर पोलिसांना संपर्क साधावा असं आवाहन सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी केलं आहे.