इंदापूर : आय मिरर
पुणे शहराची अवघ्या महाराष्ट्रात विद्येचं माहेरघर म्हणून ओळख आहे. याच पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग देखील शिक्षण क्षेत्रात आता कात टाकतोय. पुण्याच्या ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण संस्थांचं जाळ निर्माण होत असून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात गोखळीच्या माळावर २०१६ साली आपले पाय रोवलेले “गुरुकुल विद्या मंदिर” शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत भल्याभल्यांना भुरळ घालतयं.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी देखील या गुरुकुल विद्या मंदिराचं जहिरात सभेत कौतुक करीत एक प्रकारे पाठीवर शाब्वासकीची थाप दिलीय.याच गुरुकुल विद्या मंदिराचा “इंदापूर मिरर” ने दीपोत्सवाच्या निमित्ताने घेतलेला खास आढावा…
इंदापूरच्या भुमिपुत्राने गोरगरीबांच्या लेकरांना माफक खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून १७ जून २०१६ साली इंदापूर तालुक्यातील गोखळी गावी गुरुकुल विद्या मंदिराचा पाया रचला. बघता बघता अवघ्या पाच सहा वर्षाच्या कालावधीत स्वयं अर्थसाह्य या तत्त्वावरती बाळासाहेब साहेबराव हरणावळ यांनी सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेने सर्वसामान्य पालकांच्या मनात स्वत:च एक वेगळं असं अस्तित्व निर्माण केलं आणि ही संस्था नावारुपाला आली. राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यानेही या संस्थेच्या कार्याची दखल घेतली.

अवघ्या ३० विद्यार्थ्यांच्या जोरावर सुरु केलेल्या या संस्थेचा पट आज १ हजार ८०० च्या घरात जावून पोहचलाय.या विद्या मंदिरात केवळ शालेय शिक्षणचं दिलं जात नाही तर शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेचा विकास आणि उपयोजनात्मक कौशल्याची वाढ व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा, एनटीएस परीक्षा यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. नवोदय प्रवेश परीक्षा, सातारा सैनिक प्रवेश परीक्षा, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा, सायन्स ओलंपियाड फाउंडेशन मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व ओलंपियाड परीक्षा, एस.पी.आय.प्रवेश परीक्षा जी.ई.ई.( JEE) व एन.ई.ई.टी. (NEET) परीक्षा अशा विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरून मार्गदर्शन केले जाते.
गतवर्षी शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत ६४ विद्यार्थी उतरलेत. तर नवोदय प्रवेश परीक्षे आठ, सातारा सैनिक प्रवेश परीक्षेत चार विद्यार्थ्यांची निवड झालीय.एस पी आय प्रवेश परीक्षा आठ विद्यार्थ्यांची निवड तर एनटीएस आठ विद्यार्थी निवड व दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरलेत.
शालेय शिक्षणाच्या जोडीला स्पर्धा परीक्षांची जोड तसेच मिळवलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोजनात्मक वापर करण्यासाठीच्या शिक्षणावर गुरुकुल विद्या मंदिर कडून भर दिला जातो. सदर शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणापासून सुरुवात केली जाते म्हणूनच या शैक्षणिक संकुलात पहिल्या पायरीवरील विद्यार्थी व उत्तुंग शिखरावरील विद्यार्थी एकाच व्यासपीठावर शिक्षण घेतात हे या संस्थेवं वैशिष्ट्य आहे.सदर शैक्षणिक संकुलात सुजान नागरिक घडवण्याच्या दृष्टीने सर्व शालेय व सहशालेय उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येत असून आगामी काळात या विद्या मंदिराच्या माध्यमातून भारताचे नांव उंचावणारी रत्न बाहेर पडतील असा विश्वास संस्थेचे संस्थापक बाळासाहेब साहेबराव हरणावळ यांनी इंदापूर मिररशी बोलताना व्यक्त केला आहे.