इंदापूर || भाजपने गोव्याचा विकास केला आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर जी यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोव्याच्या विकासासाठी समर्पित केले होते. भाजपने विविध योजनेतून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. गोव्यात भाजप पुन्हा एकदा बहुमताने विजयी होणार आहे.गोव्याच्या समृद्धीसाठी भविष्यासाठी भाजपा हाच भक्कम पर्याय आहे असे मत माजी मंत्री भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील गोवा येथील प्रचार प्रसंगी व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे गेले काही दिवसांपासून गोवा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचार करीत आहेत व तळागाळातील नागरिकांपर्यंत ते पोहोचून संवाद साधत आहेत. तसेच केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत अनेक जाहीर सभांना उपस्थित राहत ते नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.
विकास साधण्याबरोबर गोवा येथील जेष्ठ नागरिक, महिलांच्या योजना पुरवण्या, युवकांना रोजगार देण्यास भाजप सरकार आपले कार्य सुरूच ठेवणार आहे. देशाबरोबर गोव्याचा विकास भाजप सरकार मुळे होत आहे असे ही हर्षवर्धन पाटील प्रसंगी म्हणाले.