इंदापूर : आय मिरर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दूरदृष्टी कोण ठेवून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले त्यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळेच आम्ही आज व्यासपीठावर असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. इंदापूर मध्ये शरद कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी महिला मेळावाच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना चाकणकर बोलत होत्या.
यावेळी माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे ,एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, सारीका भरणे,विभागीय महिला पुणे अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष छाया पडसाळकर यांसह मोठ्या संख्येने महिला शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
चाकणकर म्हणाल्या की, कोरोना नंतर कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाहाची समस्या वाढली आहे. एकट्या परभणी मध्ये एका वर्षात 165 बालविवाह रोखण्यात आले. रोखलेले बालविवाह 165 असतील तर झालेले किती आणि खोटी नोंद झालेले किती असा प्रश्न पडतो.सोलापूर जिल्ह्यात देखील दीडशे पेक्षा जास्त बालविवाह रोखलेले आहेत. अपरिपक्व वयात बाळंतपण लादल्याने कोरोनंतर माता मृत्यू आणि बालकांचा मृत्यू वाढला गेला. हे रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायद्यात सुधारणा होणं गरजेचं असून ज्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांच्यावरती देखील दोषारोप सिद्ध करा आणि तो सिद्ध झाल्यावर तीन महिन्यासाठी त्यांच्या पदाला तात्पुरती स्थगिती द्या अशी राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला शिफारस करायला सांगितली असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटले.
आम्हाला वंशाला वारसदार लागतो मात्र आमचे साथ वंश कोण आहेत हे सांगता येत नाहीत. ज्या सासांना वंशाला वारसदार हवाय म्हणून सुनांचा छळ होत असेल तर त्या सुनांनी सासांना विचारा तुम्ही सात पिढ्यांची वंशावळ सांगा ! मात्र सात पिढ्यांची नाव सुद्धा कोणाला सांगता येणार नाहीत. ज्या नवऱ्याला वंशाला वारसदार पाहिजे त्याला सुद्धा सात पिढ्यांची नावे सांगता येणार नाहीत.तेव्हा आवर्जून सांगा सात पिढ्यांची नावे सांगा आम्ही वंशाला दिवा देऊ ! असं रूपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी चाकणकरांच्या या विधानाला महिलांनी देखील टाळ्या वाजवत दाद दिली.
रूपाली चाकणकर यांची केंद्र सरकारवर टीका……
कोरोना आला तसा गेला मात्र त्याने पाठीमागे महाभयंकर प्रश्न सोडले.कोरोना काळात विद्यार्थिनी या ऑनलाइन शिकत राहिल्या मात्र ऑनलाइन शिक्षणाच्या पध्दतीमध्ये नको असलेल्या जाहिराती पोर्टलच्या माध्यमातून सातत्याने येत राहिल्या. याबाबत राज्य महिला आयोग केंद्र सरकारला वारंवार पत्र पाठवतोय, की अभ्यासक्रमामध्ये नसलेले विषय सातत्याने अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ऑनलाईन येतातच कसे ? यावर नियंत्रण हे केंद्र सरकारच आहे त्यामुळे केंद्र सरकारने अशा पद्धतीचे पोर्टल बंद केले पाहिजेत.कारण याच्या जाहिराती या केंद्रामधून होत असतात. यातून फार मोठा आर्थिक स्त्रोत मिळत असून हे आंतरराष्ट्रीय जाळ विणलं गेलंय यातून महाराष्ट्र असेल भारत असेल यातील युवा पिढीला कमकुवत करण्याचं यांचं धोरण असून ते यशस्वीरित्या पार पाडताहेत हे फार मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याची टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली.