• होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
Wednesday, February 1, 2023
IMirror
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी
No Result
View All Result
I Mirror
No Result
View All Result
Home सामाजिक

गोरगरिबांच्या आरोग्याच्या सेवेसाठी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे मोठे योगदान – मंगेश चिवटे

I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य ! by I Mirror…जे मांडतं निर्विवाद सत्य !
January 10, 2023
in सामाजिक
0
गोरगरिबांच्या आरोग्याच्या सेवेसाठी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे मोठे योगदान – मंगेश चिवटे

आय मिरर

गोरगरिबांच्या आरोग्याच्या सेवेसाठी ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे मोठे योगदान आहे. गोरगरिबांच्या समाजसेवेच्या कार्यामध्ये वाहून घेतलेल्या कीर्तनकारांमध्ये आमच्या मते महाराष्ट्रात पहिल्या दहामध्ये श्री.ह.भ.प. मच्छिंद्र महाराजांचा क्रमांक लागतो, त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते ‘स्वानंद भुषण पुरस्कार’ देवून गौरव करण्यात आला.याचवेळी श्री.ह.भ.प.नवनाथ महाराज लांडगे यांना ही संस्थेतर्फे स्वानंद भुषण पुरस्काराने श्री.मंगेश चिवटे हस्ते सन्मानित करण्यात आले.

स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण च्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त दत्तनगर,गोसावीवस्ती हडपसर, पुणे येथे प्रतिष्ठानच्या स्वानंद क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये रक्तदान व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. स्वानंद आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने मंगेश चिवटे यांचा स्वानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह भ प मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते स्वानंद भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान मंगेश चिवटे यांच्या हस्ते संस्थेतील कार्यकर्ते, डाॅक्टर,पत्रकार, यांना सौ.रंजना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.कोअर कमिटी अध्यक्षा सौ.सविता झोपे,डाॅ.सुजीत गायकवाड,डाॅ.सपना कोरे, सौ.सलोनी कांबळे,सौ.सुचिता हरपळे विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी निर्भिड पत्रकारितेचा पुरस्कार पत्रकार सुरेश मिसाळ यांना मंगेश चिवटे यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, मच्छिंद्र महाराज लांडगे यांचे काम निरपेक्ष आहे. गोरगरिबांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून स्वानंद संस्थेने हॉस्पिटलची पायाभरणी केली आहे.स्वानंद क्लिनिक ची सुरुवात हि भाड्याच्या शाॅप मधुन सुरुवात झाली व आज चार मजली क्लिनीक उभे आहे.अशीच स्वप्ने पाहिला हवित.याचे जीवंत उदाहरण मी आहे असे सांगत चिवटे म्हणाले की एक सामान्य कार्यकर्ता ते वैद्यकिय कक्षाचा प्रमुख हा प्रवास गुरुवर्य एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाला.एका सामान्य कार्यकर्त्याला हि संधी उपलब्ध करुन दिली.महाविकास अघाडिच्या काळात मृत अवस्थेत असनारा मुख्यमंत्री वैद्यकिय साह्यता निधी कक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत सुरु केला.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन गोरगरीब जनतेने याचा लाभ घेतला आहे.

महाराष्ट्रातील इतर किर्तनकार महाराज मंडळींनीही स्वानंद क्लिनिक चा आदर्श घ्यावा, श्री.ह.भ.प.मच्छिंद्र महाराजांनी स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण उभारुण गोरगरीबांसाठी स्वानंद क्लिनिक उभारले तसे बाकींच्या महाराज मंडळींनी आरोग्याच्या सेवेच्या बाबतीत योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजसेवेच्या कार्यामध्ये वाहून घेतलेल्या कीर्तनकारांमध्ये महाराष्ट्रात पहिल्या दहामध्ये श्री.ह.भ.प.मच्छिंद्र महाराजांचा क्रमांक माझ्या दृष्टिने लागतो.स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठाण मार्फत अशीच सेवा घडत राहो,व संस्थेने अशीच प्रगती करत रहावी अशी अपेक्षा मंगेश चिवटे यांनी व्यक्त केली.

संस्थेचे अध्यक्ष श्री.ह.भ.प.मच्छिंद्र महाराज लांडगे म्हणाले की, आम्ही महाराज मंडळी अध्यात्मिक ज्ञानाने संपन्न होवुन जगामध्ये धर्म प्रचार व प्रसार करत असतो.यामध्ये आम्हाला भागवत धर्म हेच सांगतो कि संत नामदेवांना कुत्र्यामध्ये देव दिसला,एकनाथांना गाढवात देव दिसला,मंग अम्हा महाराज मंडळिंना व तुम्हा अम्हाला माणसात तरी देव दिसावा, पहावा आणि जिवंत देवाची आरोग्य क्षेत्रात सेवा व्हावी याच उद्दिष्टाने स्वानंद क्लिनिक उभारले आहे.

ते पुढे म्हणाले, हे उभारताना अमेरीका, सिंगापुर,जपान, ओमन,नेपाळ या देशातुन व संपुर्ण भारतामधुन संस्थेला देणगी प्राप्त झाली.ज्या मान्यवरांनी देणगी दिली त्या सर्व मान्यवरांचे लांडगे यांनी आभार मानले. स्वानंद क्लिनिक मध्ये ३० रुपयात ओपीडी,१०० रुपयात ईसीजी,रक्त लघवी तपासनीवर ५०%सुट,तसेच औषधांवरती ३०% सुट व यातुनही एखादा गरीब आला पैसे नाहीत म्हणाला तर मोफत औषध उपचार केले जातात.पुढे लांडगे महाराज म्हणाले येणार्‍या ५ वर्षात ५०० बेडचे हाॅस्पिटल उभारणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Views: 75
Share

Related Posts

मतदार राजा…सुजाण हो !
महाराष्ट्र

मतदार राजा…सुजाण हो !

January 25, 2023
इंदापूरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
सामाजिक

इंदापूरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

January 24, 2023
एल.जी बनसुडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिनातून जनजागृती
सामाजिक

एल.जी बनसुडे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिनातून जनजागृती

January 17, 2023
इंदापूरातील निमगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
सामाजिक

इंदापूरातील निमगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

January 3, 2023
सरडेवाडीत क्रांतीज्योती सावित्रीमाईंना आदरांजली
सामाजिक

सरडेवाडीत क्रांतीज्योती सावित्रीमाईंना आदरांजली

January 3, 2023
बावड्याजवळील काकडेवस्ती येथे दरोडा ; १ लाख ११ हजार ७०० रुपयाचा ऐवज चोरीला
सामाजिक

इंदापूर तालुक्यातील चाकाटी शाळेच्या आवारातचं शिक्षकांचा वाद ; व्हिडिओ सोशल मिडियात वायरल

December 17, 2022
Next Post
पुण्यात मध्यरात्री रिक्षाचे भाडे घेऊन गेलेल्या रिक्षाचालकाची रिक्षा पळवली…

गागरगाव वनक्षेत्रात आढळला पंढरपूर येथील पुरूषाचा मृतदेह ; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

“इंदापूर मिरर” हे नोंदणीकृत प्रिंट माध्यम आहे. RNI -MAHMAR/2020/79273 हा आमचा अधिकृत नोंदणी क्रमांक असून www.Imirror.Digital आणि ही या माध्यमाची अधिकृत वेबसाईट आहे. हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वस्तुस्थिती वर आधारित न्यूज देणारे आधाडीचे माध्यम आहे.समाजातील सर्व घटकांना न्याय देणे व आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणे हा “इंदापूर मिरर” चा उद्देश आहे.

श्रेणीनुसार बातम्या

  • अपघात
  • आरोग्यनामा
  • आर्थिक
  • कृषिनामा
  • गुन्हेगारी
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • हवामान

ताज्या बातम्या

  • Breaking पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला येथे बस व ट्रकचा भीषण अपघात ; चार ठार – मृतांमध्ये २ पोलिसांचा समावेश
  • शेतकऱ्याच्या लेकाची वर्ध्याच्या कासरखेड्यातील कमाल, आराम करायला शेतात उभ केलं अलिशान मचाण
  • इंदापूरात तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आले माजी विद्यार्थी ; जागवल्या १९९७-९८ च्या आठवणी
  • इंदापूरातील दगडवाडीच्या सरपंच व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आ.भरणेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • होम
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • आर्थिक
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • आरोग्यनामा
  • गुन्हेगारी

© 2021 iMirror.Digital Website Designed By Deepminds Infotech Pvt. Ltd.

error: Content is protected !!