आय मिरर (विजयकुमार गायकवाड)
भिगवण परिसरात आज शनिवार (दि.१८ )मार्च रोजी अचानक अवकाळी पाऊसाने दुपारी ३ वाजता हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले असुन गव्हाची कुडी खाली पडल्याने गव्हावर काळी टिक पडण्याची तसेच गहू पांढरा पडण्याची शक्यता अधिक असल्याचे डिकसळ येथील शेतकरी चंद्रकांत नानाभाऊ हगारे यांनी सांगितले आहे.
यात हगारे यांच्या दोन एकर गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले असून परीसारातील भिगवण तक्रारवाडी ,राजेगाव, खानवटे आदि. गावामध्ये सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे विजेच्या कडकडासह गारांचा पाऊस पडत होता नुकसानग्रस्त पिकाचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.