इंदापूर : आय मिरर
इंदापूर मध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेलं “गांधी सराफ” हे केवळ नांव नाही तर आता तो इंदापूरचा एक ब्रॅन्ड झाला आहे.महिलांसाठी दागिणे म्हटलं की जीव की प्राण असतो आणि दागिण्यांच्या खरेदीसाठी महिलांनी इंदापूरात आपली पावलं टाकली ती आपोआपचं गांधी सराफकडेचं वळतात…त्याला कारण ही तसचं आहे.महिलांची नेमकी पसंती ओळखून विविध दागिण्यांच्या आकर्षक मनपसंतीला उतरणाऱ्या सुंदर डिझाइन त्यांकडे तयारचं असतात.
इंदापूर शहरात ३३ वर्षांपूर्वी पन्नास स्क्वेअर फुट जागेत नरेंद्र गांधी यांनी “गांधी सराफ बारामतीकर” या दालणाचा पाया भरला.अनं बघता बघता गांधी सराफ अँन्ड कंपनी इंदापूरची सुवर्ण अलंकाराची महा ब्रॅन्ड बनली. इमानदारी, सचोटी,पारदर्शकता,आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करुन सुरु केलेला हा व्यवसाय आज ८०० स्क्वेअर फुटाच्या जागेत उभारला असून वातानुकूलित असलेलं हे भव्यदिव्य सोन्याचं दालन इंदापूर शहराच्या वैभवात भर घालतयं.
33 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या सुवर्णपेढीचा आवाकाही तसाचं आहे. केवळ इंदापूरचं नव्हे तर आसपासच्या शेकडो किलोमीटर अंतरावरील ग्राहकांनाही याची भुरळं पडलीय.गांधी सराफ यांच्या दालणात अँन्टीक ज्वेलरी,कलकत्ता ज्वेलरी,लेझर कटींग ज्वेलरीचे असलेले अत्याधुनिक प्रकार ग्राहकांच्या पसंतीला उतराहेत.अगदी युवतींपासून ते नववधू अनं वृध्दांपर्यंत सर्वांच्याचं मनाचं समाधान इथे होते.एकदा का तुम्ही गांधी सराफ ची पायरी चढला की पुन्हा तुमची पावले आपोआप तिकडेचं वळतात.दुकानचे मालक नरेंद्र गांधी व तन्मय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक सेवा दिली जाते.ग्राहकांच्या आग्रहास्तव नव्यानेचं सुवर्ण संचय योजना सुरू करण्यात आली असून या योजनेस भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे सुवर्ण खरेदीचं तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही एकदा गांधी सराफ च्या दालणास भेट द्याचं !