इंदापूर : आय मिरर
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 2 महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, पुणे ग्रुप हेडक्वार्टर, पुणे यांच्या आदेशान्वये आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 वाजता इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागाच्या वतीने एकता दिन साजरा करण्यात आला.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या अखंडत्त्वसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त दि. 31 ऑक्टोबर रोजी भारत सरकार गेल्या अनेक वर्षांपासून देशभर राष्ट्रीय एकता दिन साजरा करीत आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय छात्र सेनेच्या कँडेट्सनी इंदापूर शहरात एकतेची रॅली काढून राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली, अशी माहिती एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, प्रा. व्ही. बी. जाधव (निवृत्त प्राध्यापक), डॉ. भिमाजी भोर, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. धनंजय भोसले, डॉ. तानाजी कसबे, एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे आणि एनसीसीचे 86 कॅडेट्स उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 2 महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, पुणे येथील ऍडम ऑफिसर कर्नल फराद अहमद, लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे, कंपनी सार्जंट मेजर महेश देवकर, कंपनी क्वार्टर मास्टर सार्जंट अपेक्षा कुदळे, सार्जंट रुद्रकुमार गवळी, सार्जंट ओम क्षीरसागर, सार्जंट अवंतिका मखरे, कार्पोरल निखिल हगारे, कार्पोरल शुभम दगडे, कार्पोरल साक्षी जाधव, लान्सकार्पोरल शिवरत्न लोंढे आणि एनसीसीचे कॅडेट्स यांचे सहकार्य लाभले.