इंदापूर : आय मिरर
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत निदान झालेल्या क्षय रुग्णांना उपचार आणि आहार या संदर्भात केंद्र सरकारने अभियान सुरू केले असून सामाजिक संस्था, विविध प्रतिष्ठान, समाजातील दानशूर व्यक्ती, यांच्या माध्यमातून क्षय रुग्णांना पोषण आहार दिला जाणार आहे. या आव्हानाला प्रतिसाद म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये विविध आरोग्य संस्थांमध्ये निक्षय मित्रांची निवड करण्यात आली आहे.त्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद अरकिले यांनी 5 क्षय रुग्णांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आलेय.
या पोषण आहार वाटप प्रसंगी उपस्थित निमगाव केतकीचे उपसरपंच बाबजी भोंग, लक्ष्मण फरांदे, मंगेश घाडगे, विठ्ठल मिसाळ, निमगांव केतकी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास व्यवहारे रुग्णालयातील सर्व कर्मचारी तसेच टीबी विभागाचे इंदापूर तालुका औषधोपचार पर्यवेक्षक सहदेव मोहिते,प्रयोगशाळा पर्यवेक्षक खेडकर व लॅब टेक्निशन बोराटे व्ही आर उपस्थित होते.
निक्षय मित्रांमार्फत क्षय रुग्णांना धीर देणे, आधार देणे, आर्थिक हातभार लावणे, व औषधोपचाराची मदत करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने हे अभियान सुरू केले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये 372 रुग्ण असून या सर्व रुग्णांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे, डॉ. संजय दराडे, ग्रामीण रुग्णालय निमगाव केतकीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास व्यवहारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सरतापे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षय रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध सामाजिक कार्य करणारी प्रतिष्ठान, दानशूर व्यक्ती, विविध कंपन्या, यांनी क्षय रुग्णांचे पालकत्व स्वीकारावे असे आवाहन आरोग्य विभाग इंदापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.